जळगावात ‘वीकेंड’ला किराणा दुकान, भाजीपाला, फळे, गॅरेज सुरू राहणार

एप्रिल 9, 2021 1:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात विशेष निर्बंध लागू करताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वीकेंडला सर्व बंद असल्याचे जाहीर केले होते. 

जिल्हा प्रशासनाने नंतर काढलेल्या आदेशानुसार शनिवारी, रविवारी देखील अत्यावश्यक सेवा, किराणा दुकान, फळे, भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत निवासी नायब जिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories