जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकत संपूर्ण महाराष्ट्र व्यापताना दिसत असून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जळगाव जिल्ह्यातही काल २८ रोजी पहाटे आणि रात्री पावसाने हजेरी लावली. जळगावमध्ये मान्सून कधी दाखल होण्याची याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान काल पावसाने हजेरी लावल्यानंतर आजपासून तीन दिवस जिल्ह्यात हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे.

सध्या मान्सून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पोहचला आहे. तो लवकरच जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून जळगावात तो ३० मे ते ५ जून दरम्यान सक्रिय होण्याचे संकेत आहे. याकाळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. कारण अरबी समुद्रातील अवदाब उत्तर-पश्चिमेकडे सरकला असून बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा प्रभाव तामिळनाडू किनारपट्टीपुरता आहे. या काळात हवामान दमट राहील, हवामान अभ्यासकांनी सांगितले.
जळगावत जोरदार पाऊस झाला आहे. बुधवारी पहाटे ४ वाजेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली त्यांनतर दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जळगावमधील विविध भागात पाऊस पडला.
आजपासून तीन दिवस असं राहणार हवामान?
२९ मेः रात्री २५ ते ३० डिग्री सेल्सियस व दिवसा ३५ ते ४१ डिग्री सेल्सियस तापमान अपेक्षित आहे. आर्द्रता २८ ते ४७टक्के राहील. ज्यामुळे उकाडा जाणवेल. पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने २२ ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. सायंकाळनंतर हलक्या पावसाची दाट
३० मे : तापमान दिवसा ३५.४१ डिग्री सेल्सियस राहील. आर्द्रता सुमारे २६-४० टक्के असेल. पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने २९-४३ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. पाऊस पडण्याची शक्यता नाही, आणि आकाश अंशतः ढगाळ किंवा स्वच्छ राहील. हवेची गुणवत्ता मध्यम असेल.
३१ मे : तापमान दिवसा ३५ ते ४१ डिग्री सेल्सियस राहील. आर्द्रता २७ ते ४१ टक्के असेल. पश्चिम दिशेने १८.४३ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. आकाशात काही लहान ढंग असतील, पण पाऊस अपेक्षित नाही. हवेची गुणवत्ता मध्यम ते उच्च राहील असे हवामान अभ्यासक यांनी सांगितले.