जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । जानेवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) हवामानात अनेक बदल घडून आलेत. कधी थंडीचा जोर तर कधी ढगाळ वातावरण अशा अनेक विचित्र परिस्थिती बघायला मिळाल्या. डिसेंबरच्या मध्यात व जानेवारीच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवला. एकीकडे थंडीचा कडाका जाणवला नसला तरी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यात तापमानात (Jalgaon Tempreture) वाढ व्हायला सुरुवात झाली आहे.

फेब्रुवारीतच जळगावकरांना चटके जाणवू लागल्याने पुढे एप्रिल-मे महिन्यात काय परिस्थिती असेल, याचाच विचार सर्वसामान्य जळगावकर करू लागले आहेत.
जळगाव जिल्ह्यात दिवसाच्या तापमानात वाढ होत असून, गुरुवारी (दि ६) जळगाव शहराचा दिवसाचा पारा ३४ अंशांपर्यंत पोहोचला होता. तर किमान तापमान १६ तसेच आगामी काही दिवसांत हा पारा ३५ ते ३६ अंशांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मागील काही दिवसांमध्ये जळगावातील किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसत आहे. परंतु रात्री आणि पहाटच्या वेळेस काहीशी थंडी जाणवत आहे. मात्र दुपारी उन्हाचा कडक चटका जाणवत जाणवत आहे.
आजपासून आगामी चार दिवस असं राहणार तापमान
७ फेब्रुवारी – रात्रीचा पारा १७ अंश…. दिवसाचा पारा३२ अंश
८ फेब्रुवारी – रात्रीचा पारा १९ अंश…. दिवसाचा पारा३३ अंश
९ फेब्रुवारी – रात्रीचा पारा १८ अंश… दिवसाचा पारा३४ अंश
१० फेब्रुवारी – रात्रीचा पारा १८ अंश… दिवसाचा पारा३४ अंश