जळगाव जिल्हाहवामान
तापमानाचा पारा वाढला, उकाड्याने जळगावकर हैराण ; आगामी पाच दिवस कसं राहणार तापमान?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२५ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील तापमानात चढउतार जाणवत आहे. किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाड्याने जळगावकर हैराण झाले आहे.
जळगावात सोमवारी कमाल तापमान ३४ अंशांवर होते. त्यामुळे दिवसभर उन्हाचे चटके जाणवले. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाची तीव्रता अधिक होती. दरम्यान, जिल्ह्यात ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान हवामानात चढ-उतार होणार आहे.
या काळात किमान तापमान १५ ते १७ अंश तर कमाल तापमानात वाढ होऊन ते ३२-३३ अंश राहील. ८ फेब्रुवारीपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी पहाटे थंडीचा प्रभाव जाणवेल. उत्तर, मध्य भारतात बदललेली हवामानाची स्थिती यासाठी कारणीभूत आहे. जिल्ह्यात त्याचा प्रभाव पडत असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली.