जळगावकरांना दोन वर्ष पाण्याचे ‘नो टेन्शन’ ; वाघूर धरण 95 टक्के भरले

सप्टेंबर 4, 2024 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२४ । यंदा दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने जळगावकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान जळगाव शहराला पाणीपुरवठा होणारे वाघूर धरण ९५ टक्के भरले असल्याने जळगावकरांची दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे.

waghur dam

जळगाव शहराला दररोज ८० दशलक्ष लिटर्स पाणी लागत असल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे. जळगाव शहराला दैनंदिन पाणीपुरवठा हा वाघूर धरणावरून केला जातो. यंदा पाऊस चांगला पडत असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.

वाघूर धरणदेखील सध्या स्थितीत ९५.३९ टक्के भरले आहे. मागील वर्षी कमी पावसामुळे वाघूर धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने पाण्याची पातळी कमी झालेली होती. गतवर्षी धरणात ५७.३० टक्के पाणीसाठा होता. यंदा जर पाऊस चांगला झाला नसता तर जळगावची चिंता वाढली असती. मात्र, चांगल्या पावसामुळे वाघूर धरण भरले असून, यामुळे दोन वर्षाची चिंता मिटणार आहे.

दरम्यान, आज बुधवारी सकाळी धरणाचे २ दरवाजे ०.३० मीटरने उघडले असून, यातून १३०७.३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीत सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now