जळगाव जिल्हा
Jalgaon : विकास गोल्डचे दूध प्रति लिटर ‘इतक्या’ रुपयाने झाले स्वस्त..
जळगाव लाईव्ह न्यूज : 24 जानेवारी 2024 : जळगाव जिल्हा सरकारी दूध उत्पादक संघातर्फे म्हशीचे विकास गोल्ड दुधाचे दर कमी करण्यात आले आहे.प्रति लिटर 2 रुपयाची कपात करण्यात आली आहे. कमी केलेले दर 22 जानेवारीपासून लागू झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ही शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची एक विश्वासाची सहकारी संस्था म्हणून लौकीक प्राप्त आहे. ताजे तसेच अतिशय उत्तम दर्जाचे असल्याने विकास दूध हे ग्राहक आवडीने खरेदी करतात. ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन दूध संघाचे चेअमरन आमदार मंगेश चव्हाण तसेच कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी निवेदनातून केले आहे.