घृणास्पद : घरी सोडतो असं म्हणत २९ वर्षीय तरुणाने केला ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार !

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२३। चाळीसगाव शहरातील सात वर्षीय चिमुकलीला घरी सोडता असा म्हणतएकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक सुद्धा करण्यात आला आहे.

crime 18 jpg webp

चाळीसगाव शहरात ७ वर्षीय चिमुकली वास्तव्यास आहे. “घरी सोडून देतो” असे सांगून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय-२९) रा. नारायणवाडी, चाळीसगाव याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन “तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल” अशी धमकी दिली.

दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन केला. ही धक्कादाय घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिची आई यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सुपड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now