⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

इगतपुरी,भुसावळ मेमू ट्रेनसाठी प्रस्ताव

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । जळगाव, भुसावळकडे सुटणारी एकही पॅसेंजर गाडी किंवा मेमू ट्रेन नसल्याने व्यापारी, विद्यार्थी, चाकरमान्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच इगतपुरी-देवळाली-नाशिक-भुसावळकडे सकाळी धावणारी पॅसेंजर दोन वर्षांपासून बंद आहे. ही गाडी पुन्हा सुरू करण्यातयावी अशी मागणी ट्रेन लाइव्ह प्रवासी संघटनेने ९ एप्रिलला केली होती. त्यानुसार या मार्गावर सकाळी मेमू गाडी सुरू करण्यासाठी, भुसावळ विभागातून मुंबई मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

ट्रेन लाइव्ह प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील हे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. संघटनेने भुसावळात रेल्वे प्रशासनाला पत्र दिल्यानंतर भुसावळ-देवळाली मार्गावर एक ट्रेन सुरू करण्यात आली. तसेच संघटनेच्या मागणीनुसार ट्रेनचा प्रस्ताव भुसावळ येथून मुंबई येथील परिचालन मुख्यालयाला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार यांनी ११ रोजी पाटील यांना पत्राद्वारे दिली आहे.