⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

यंदा‎ मार्च महिन्यातच मे हीटचा तडाखा जाणवणार? जळगावकर उष्णतेने होणार ‎हैराण..

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२३ । अजून फेब्रुवारी महिना संपला नसून उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे त्यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण केले आहे.‎ मागच्या काही दिवसांपासून मे-जूनसारखी उष्णता फेब्रुवारीमध्येच जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातच यंदा‎ मे हीटची परिचिती येणार‎ असल्याची शक्यता आहे. येत्या २८‎ फेब्रुवारीपासून उत्तर महारा‌ष्ट्रात‎ तापमानात वाढ हाेईल. पारा‎ चाळिशीपुढे जाण्याची शक्यता‎ हवामान विभागाकडून वर्तवण्यात‎ आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये सतत‎ तापमान वाढत आहे. ढगाळ‎ वातावरणाचा अपवाद वगळता‎ जिल्ह्यात कमाल तापमान ३६‎ अंशांपुढे गेलेले आहे. तर किमान‎ तापमान ९ ते १० अंशांवर स्थिर‎ आहे. त्यामुळे दिवसा आणि‎ रात्रीच्या तापमानातील तफावत‎ वाढत असून, त्याचा परिणाम‎ आराेग्यावर हाेताना दिसताे आहे. या‎ वर्षी मार्च महिना सर्वाधिक हाॅट‎ असेल. या महिन्यात तापमान ४२‎ अंश सेल्सिअसपुढे जाण्याची‎ शक्यता आहे.

गेल्या दाेन‎ दिवसांपासून उन्हाचे बसणारे चटके‎ हे त्याचेच संकेत असल्याचे समाेर‎ येते आहे. विशेष म्हणजे यंदा‎ उन्हाळ्याच्या पंधरा दिवस आधीच‎ उन्हाचे चटके बसू लागले आहेत.‎सकाळी नऊ वाजेपासूनच शरीराला उन्हाचे चटके जाणवत आहे. दुपारच्या वेळी तर दुचाकीवर फिरताना अक्षरश: आगीच्या लोळामधून दुचाकी जात आहे की काय, अशी अवस्था होत आहे.