जळगाव पुन्हा गारठणार! आजपासून आगामी पाच दिवस असे राहील तापमान?
जळगाव लाईव्ह न्यूज | 30 जानेवारी 2024 | राज्यातील तापमानात सतत बदल होताना पाहायला मिळतेय. उत्तर भारतातील थंडीच्या कडाक्याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यावर दिसून आला. गेल्या आठवडाभरापासून कडाक्याच्या थंडीने जळगावकर गारठले होते. त्यानंतर दोन दिवसांपासून तापमानात वाढ होऊन, काही प्रमाणात गारठ्यापासून दिलासा मिळाला होता. मात्र, आगामी पाच दिवस जळगावकर पुन्हा थंडीने गारठण्याची शक्यता आहे.
कोरड्या हवामानामुळे आगामी पाच दिवसात जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान वर्तविण्यात आला आहे. आज ३० जानेवारीपासून रात्रीच्या तापमानात घट होऊन पारा ७ अंशापर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात थंडीचे पुनरागमन होणार आहे. फेब्रुवारीत थंडीचा कडाका कमी होऊन, तापमानात वाढ होत जाते. मात्र, यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नीचांकी तापामान राहू शकते
आगामी पाच दिवस असे राहणार तापमान :
आज ३० जानेवारी रात्रीचे तापमान १० अंश तर दिवसाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.
३१ जानेवारीच्या रात्रीचे तापमान ९ अंश तर दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
१ फेब्रुवारी रात्रीचे तापमान ७ अंश तर दिवसाचे तापमान २७ अंश सेल्सिअस राहील.
२ फेब्रुवारी रात्रीचे तापमान ८ अंश तर दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअस राहील.
३ फेब्रुवारी रात्रीचे तापमान ९ अंश तर दिवसाचे तापमान २७ अंश सेल्सिअस असे राहील