जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२५ । जळगावकर सध्या संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत आहेत. दुपारी कडक ऊन तापत असून मात्र रात्रीच्या वेळी थंडीही जाणवत आहे. काल गुरुवारी, दि. १३ फेब्रुवारीला जळगावचे किमान १३ व कमाल ३२.६ अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उद्या १५ फेब्रुवारीपासून तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. Jalgaon Weather Update

मकर संक्रांतीनंतर ऊन तापण्यास सुरुवात होते. फेब्रुवारी महिना अर्धा संपला असून जळगावच्या तापमानात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. सध्या कमाल तापमान सातत्याने ३३ अंश सेल्सिअसच्या वरती जात असल्यामुळे उन्हाची चाहूल लागली आहे. पहाटे हलकी थंडी आणि दुपारी कडाक्याचे ऊन असल्यामुळे आता उन्हाचे चटके जळगावकरांना जाणवू लागले आहे.
उद्यापासून निरभ्र आकाश राहील. तसेच किमान व कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारी उन्हाचा चटका चांगलाच बसू लागला आहे. त्यामुळे त्यापासून संरक्षणासाठी सनकोट, मोठे रुमाल, स्कार्फ, टोपी यांना मागणी वाढली आहे.
आजपासून आगामी सहा दिवस असे राहणार अपमान?
१४ फेब्रुवारी : किमान – १५.. कमाल- ३३.०
१५ फेब्रुवारी : किमान १६…. कमाल-३४.०
१६ फेब्रुवारी : किमान -१६…. कमाल- ३४.०
१७ फेब्रुवारी : किमान – १६…. कमाल- ३४.०
१८ फेब्रुवारी : किमान – १७…. कमाल- ३५.०
१९ फेब्रुवारी : किमान १७ .. कमाल- ३४.०