जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२५ । गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही अंशी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. शनिवारी जळगाव शहराचा पारा ३९ अंशापर्यंत खाली आला होता. सोमवारपासून तापमानात पुन्हा वाढ होत असून, मंगळवारी जळगाव शहराचा पारा पुन्हा ४२ अंशावर पोहचला होता. पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मागच्या दोन दिवसात जळगावच्या तापमानात २ ते ३ अंशाची वाढ झाली आहे. दरम्यान, आज १६ एप्रिलपासून पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात लक्षणीय चढ-उतार होण्याची शक्यता असून ठराविक तालुक्यांमध्ये गारपिटीस आणि पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाचा कहर आहे. जिल्ह्यातील भुसावळ येथे तापमानाने ४५ अंशापर्यंत मजल मारली होती. इतर तालुक्यांमध्ये देखील तापमानत वाढ झाल्याने उष्णतेची झळ बसत असून यापासून जळगावकर हैराण झाला आहे.
यातच गेला आठवड्याच्या अखेरीस जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाचा पारा घसरला होता. शनिवारी जळगावचे तापमाना ३८ अंशापर्यंत घसरले होते. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात पुन्हा वाढू लागले. गेल्या दोन दिवसात तापमानत ३ अंशापर्यंत वाढ झाली असून यातच आगामी तीन दिवसात लक्षणीय चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
आज जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. तर काही तालुक्यांमध्ये गारपीटसह पावसाचा अंदाज आहे. आज जिल्ह्यातील कमाल तापमान ४० ते ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या वेळी दुपारी आर्द्रता ३०-४० टक्के तर रात्री ५०-६० टक्के दरम्यान राहील. १७ एप्रिल रोजी ढगाळतेमुळे तापमानात किंचित घट होऊन ते ३९-४१ डिग्री दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच गुजरात आणि राजस्थानकडून येणाऱ्या लु सारख्या वाऱ्यांमुळे १८ एप्रिलपासून तापमान ४२ ते ४४ डिग्रीपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. १८ तारखेला तापमान ४४ वर पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.