जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । राज्यात अनेक शहरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यात कमाल तापमानात घसरण झाली आहे. जळगावात (Jalgaon) देखील तापमानात (temperature) घट झाली असून रविवारी जळगावचे तापमान ४१.३ अंश नोंदवले. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र पुढील चार ते पाच दिवसात तापमान पुन्हा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी ११ वाजेपर्यंत उन्हाचा पारा ३५ अंशावर असल्याचे दिसून येत असून तो दुपारी ४ वाजेपर्यंत ४१ अंशावर जाईल.
यंदाचा उन्हाळा चांगलंच त्रासदायक ठरला आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाचा उकाडा जाणवत होता. त्यात एप्रिल महिन्यात तर उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळाला. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा ४२ ते ४३ तर काही ठिकाणी ४५ ते ४७ अंशापर्यंत गेला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे राज्यात कमाल तापमान घसरले आहे.
जळगावचा पारा देखील घसरला असून असह्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवसात कमाल तापमानात किंचित वाढीची शक्यता असल्याने किमान २८ मे पर्यंत उकाड्यापासून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. आयएमडीने रविवारी जळगावचे तापमान ४१.३ अंश नोंदवले. सोमवार ते गुरुवारपर्यंत कमाल तापमान ४२, त्यापुढील दोन दिवस ४३ अंशांपर्यंत असू शकते.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला – ३६ अंश
१२ वाजेला – ३७ अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला – ४० अंश
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४० अंश
५ वाजेला – ३९ अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३४ तर रात्री ९ वाजेला ३३ अंशावर स्थिरावणार.