जळगावच्या तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई: वाळू तस्करी रोखण्यासाठी घेतली थेट नदीपात्रात उडी, VIDEO व्हायरल

जुलै 24, 2025 10:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून पोलीस आणि महसूल विभागाकडून अनेकवेळा कारवाईचे करूनही वाळू तस्करी काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच जळगावच्या एका तहसीलदार साहेबाची राज्यभरात चर्चा होत आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी या तहसीलदार साहेबांनी थेट नदीपात्रात पोहून वाळूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.महेंद्र सूर्यवंशी असं या तहसीलदारांचे नाव आहे.

tt

प्रशासनातील एका जबाबदार अधिकाऱ्याने दाखवलेल्या धैर्याने सध्या ते चर्चेचा विषय बनले आहेत. धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आटोपून परतत असताना, याच बांभोरी पुलावरून त्यांना काही वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा करताना दिसले.

क्षणाचाही विलंब न लावता, कर्तव्यदक्ष तहसीलदार सूर्यवंशी यांनी आपले वाहन थांबवले आणि थेट नदीपात्रात उतरले. नदीत पाणी जास्त असतानाही, त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतली आणि पोहत दुसऱ्या किनाऱ्याकडे निघाले. तहसीलदारांना आपल्या दिशेने येताना पाहताच, वाळू माफियांनी तातडीने पळ काढला.

तहसीलदार सूर्यवंशी यांनीही त्यांचा पाठलाग केला. कर्तव्यनिष्ठेचं अनोखं उदाहरण घालून देणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. प्रशासनाचा वचक यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now