टेनिस क्रिकेट स्पर्धेत जळगांवचा संघ विजेता
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या १९ वर्षाखालील ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत जळगांवच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक व मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
मुलींच्या कर्णधार शरयू बाविस्कर यांच्या नेतृत्वात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संघाचे खेळाडू कामिनी पाटील,कार्तिकी चौधरी, सुविता साळुंखे,पूजा पाटील,विशाखा पाटील,एकता दहाळ,श्वेता अहिरे,शिल्पा पाटील,जानवी पाटील,प्राजक्ता चौधरी यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. वूमन ऑफ द सिरीज कार्तिकी चौधरी ठरली. जळगांवच्या संघाने उस्मानाबाद संघावर विजय मिळवून विजेते पद पटकावले.
मुलांचा संघाने कर्णधार महेश पाटील यांच्या नेतृत्वात द्वितीय क्रमांक पटकावला. संघाचे खेळाडू आयुष पाटील, लोकेश पाटील, जितेंद्र पावरा, पवन पाटील, मयूर पाटील, रोहन धनगर, दिपक जाधव, अनिल मोहिते, हितेश पाटील, मनीष चौधरी, वैभव दहाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. बेस्ट बॉलर ऑफ द सिरिज पवन पाटील ठरला. विजयी खेळाडूंना क्रीडाशिक्षक अरविंद जाधव, विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धा २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२२ रोजी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झाल्या. जळगांव जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अॅड.राहूल वाकलकर, डॉ.अभिषेक पाटील, आकाश धनगर, अनिल बाविस्कर, राहुल पाटील, प्रतीक शुक्ला, उमेश हंडे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन महासचिव मिनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेकनिकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे यांच्या देखरेखेखाली संपन्न झाल्या.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन