जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । मागील काही एक दीड महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतींनी उसळी घेतली आहे. दिवाळीत सोने प्रति तोळा ८० हजार रुपये तर चांदी एक लाखावर पोहोचली होती. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. तरी देखील सध्या सोने चांदी खरेदी करणं सर्वसामान्य ग्राहकांच्या आवक्या बाहेरच आहे. दरम्यान आज विकेण्डला सोन्याचे दर घसरले आहेत. लग्न सराईत सोन्याचे दर घसरल्याने दिलासा मिळाला आहे.
29 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.24 आणि 22 कॅरेटच्या दरात 150 रुपयांची घट झाली आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 77,400 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,050 रुपयांच्या जवळ आला. एक किलो चांदीसाठी 89500 रुपये किलोमागे मोजावे लागणार आहेत. चांदीच्या दरात विशेष कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे भाव मागच्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी स्थिर राहिले आहेत.
कमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते 2025 मध्ये सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येईल. 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारवर जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आताच गुंतवणूक करावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2025 मध्ये सोनं सर्वात जास्त आणि चांगले भरवशाचे रिटर्न्स देईल असंही सांगितलं जात आहे.