यावल

यावलहुन शेळगाव मार्गे जळगावला येताय? आधी ही बातमी वाचा, नाहीतर होईल गैरसोय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । यावलहुन शेळगावमार्गे जळगावला येणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे बोरावल टाकरखेडा मार्ग जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर असलेला शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प या मार्गावरील नागरीकांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठीचा रस्ता जलसंपदा विभागाच्या आदेशाने आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अप-डाऊन करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहेत.

यावल तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज या महत्वकांशी मध्यम प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम पोहचले आहे. यामुळे प्रकल्पाचे मुख्यकाम पुर्ण झाले असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात नागरीकांसाठी बोरावल टाकरखेडा व शेळगाव मार्ग जळगावसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतुकीसाठीचा कच्चा रस्ता १३ जूनपासून बंद करण्यात आला आहे.

या मार्गावरून पूर सदृ:श परिस्थितीमुळे प्रकल्पात साचणारे पाणी या मुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. नागरिकांना व वाहनधारकांनी कुठल्याही कारणास्तव तापी नदीच्या पात्रातुन जाण्याचा प्रयत्न करू नये व संभाव्य दुर्घटना टाळावी असे आवाहन जलसंपदा विभाग, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, यावलहुन शेळगाव मार्गे जळगाव येण्यासाठी हा रस्ता अप-डाऊन करणाऱ्यांसह स्थानिकांसाठी सोयीस्कर ठरत होता. कारण यावलवरून भुसावळ वा किनगाव मार्गे जळगावचे अंतर जवळपास ४५ ते ५० किमी इतके होते. मात्र शेळगाव मार्गे हे अंतर निम्म्यावर होते. त्यामुळे हा रस्ता सोयीस्कर होता. मात्र आता पावसाळा सुरु होणार असलयाने शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पमध्ये तयार करण्यात आलेला रस्ता बंद करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button