जळगावकरांना उकाड्यापासून मिळेल लवकरच दिलासा ; हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अदांज..

मे 15, 2023 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । राज्यातील अनेक भागात तापमानाच्या वाढीने कहर केला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगाव जिल्ह्यात होत असल्याने जळगावकर उकाड्याने चांगलाच हैराण झाला आहे. मात्र लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन दिवासापूर्वी ४५ अंशावर असलेलं तापमान रविवारी ४३ अंशावर होते. येत्या २० मे पर्यंत तापमानाचा पारा कमी होईल, असं हवामान खात्याने सांगितले आहे.

tapman 2

जळगावमध्ये मागच्या आठवड्यापासून तापमानात वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा ४० अंशाखाली होता. मात्र हवामान बदल झाल्याने उन्हाचा चटका हळूहळू वाढत गेला. मागील आठवड्यात तापमान ४५ अंशावर गेलं होते.

सलग पाच ते सहा दिवस राज्यात सार्वधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये झालीय. मात्र येत्या २० मे पर्यंत तापमानाचा पारा काही प्रमाणात कमी होईल, सोमवारी आणि मंगळवारी तापमानाचा पारा ४० अंशावर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्यात तापमानाची नोंद वाढत असताना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाना दिला होता. त्यानुसार, राज्यात काही ठिकाणी पुन्हा उन्हाचा 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत काल 14 तारखेला राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या तापमानाची आकडेवारी जाहीर केली.
यात जळगाव 43.2, परभणी 43.0°C, सोलापूर 41.1, बीड 42.7, छत्रपती संभाजीनगर 41, नांदेड 42.6, उदगीर 39.8, जालना 42.5, मालेगाव 43.2,धाराशीव 40.2

उन्हाळ्यात अशी घ्या काळजी –
उन्हाळ्यात होणारे आजार व उष्माघातचा त्रास आपण टाळू शकतो. मात्र त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागते, त्यावेळी शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर पडू नये. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट ठेवावे. जेणेकरून ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो. तसेच डोळ्यांवर गॉगल्स आणि डोक्यावर टोपी वापरावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now