तुम्ही निवडून या राजूभाऊ.. तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल! महिला भगिनींची आ. राजूमामा भोळेंना साद

नोव्हेंबर 13, 2024 4:48 PM

इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगरात प्रचार रॅली

RB13Nov

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । ‘राजूभाऊ तुम्ही निवडून या, तेव्हाच आमची भाऊबीज साजरी होईल…अब कि बार, राजूमामाच आमदार…’ अशा शब्दात शुभेच्छा देऊन महिला भगिनींनी आ. राजूमामा भोळे यांना विजयाचे आशीर्वाद दिले. ते इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगर, राधाकृष्ण नगरात प्रचार रॅलीला आले होते.

आ. राजूमामा भोळे यांनी बुधवारी प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी नगर येथील खडके चाळ येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून गेंदालाल मिल, कानळदा रोड, लक्ष्मी नगर, इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर परिसरात प्रचार रॅली निघाली. रॅलीत आ. भोळे यांचे सर्वत्र सहर्ष स्वागत करण्यात आले. अनेक जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

इंद्रप्रस्थ नगरातील अंबामाता मंदिरात श्री अंबामातेचा तसेच, गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद आ. भोळेंनी घेतला. यानंतर विविध मान्यवरांच्या घरी जाऊन तेथील जेष्ठांना भेटत आ. भोळे यांनी दिवसाचा पहिला टप्पा यशस्वी केला. दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून कॉलन्यांमध्ये औंक्षण करण्यासाठी महिलांची रांग लागताना दिसून येत आहे. वेळेच्या मर्यादेत आ. राजूमामा भोळे सर्वांच्या घरी जाऊन नमस्कार करीत आशीर्वाद घेत आहेत.

रॅलीत मंडळ क्र. १ चे अध्यक्ष संजय शिंपी, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, राजू मराठे, कैलास सोनवणे, गबलू खान, मंगेश जोहरे, दीपक झुंजारराव, आनंद सपकाळे, आकाश मोरे, विनय चौधरी, महेश पाटील, मंगला बारी, शिवसेनेचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, महानगरप्रमुख संतोष पाटील, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, हर्षल मावळे, सोहम विसपुते, संदीप पाटील, अमर राजपूत, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे विनोद देशमुख, माजी नगरसेवक लता मोरे, फैजान पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे, मनोज निकम, श्रावण मोरे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, आरपीआय आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now