विश्रांतीनंतर जळगावात पुन्हा पावसाचा इशारा; वाचा काय आहे अंदाज?

जुलै 11, 2024 12:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२४ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. अद्यापही राज्यातील काही भागात पाऊस सुरु असून आजदेखील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभानाने वर्तवला आहे. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात पावसाने ब्रेक घेतल्याचे दिसून आले.

Rian Jalgaon jpg webp

दोन आठवड्यांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने बुधवारी विश्रांती घेतली; परंतु आज गुरुवारी अंशतः ढगाळ वातावरण राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान वर्तवली आहे. जळगावात मंगळवारी ३० अंशाखाली गेलेलं तापमान बुधवारी ३२.४ अंश सेल्सिअसवर गेलं होते. यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे.

सकाळी काही वेळ ढगाळ वातावरण होते. त्यानंतर कडक उन्ह पडले होते. दरम्यान,आज ११ आणि १२ जुलै रोजी शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर १३, १४ तारखेला जिल्ह्यासह शहरातील विविध भागात रात्रीच्या वेळी पाऊस हजेरी लावू शकतो. त्यानंतर पुन्हा १५ आणि १६ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

राज्यात आज पावसाची स्थिती काय?
आज मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम पाऊस पडेल. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now