महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हाय अलर्ट, जळगाव जिल्ह्यात कसं असेल वातावरण ? जाणून घ्या

जुलै 6, 2025 10:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२५ । राज्यात पाऊस सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. मागच्या दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावत आहे. अशातच अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात आजपासून ९ जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे.

rn6july

पुढील तीन दिवस कसं असेल वातावरण ? जाणून घ्या
६ जुलै रोजी या जिल्ह्यांना अलर्ट
६ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि कोल्हापूर, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.बीड ,नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार,वर्धा,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

७ जुलै रोजी या जिल्ह्यांना अलर्ट
७ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे ,पालघर, नाशिक, नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली, नांदेड,नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट जरी केला आहे.

८ जुलै रोजी या जिल्ह्यांना अलर्ट
८ जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर ,भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली,तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट आहे. ९ जुलै रोजी तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट,नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now