जळगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची बैठक!
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । येथील रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची जळगाव स्टेशन प्रबंधक यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीला डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक साखरे, प्रकाश पंडित, आनंद सपकाळे, रेखाताई वर्मा, गणेश माळी,अशोक धूत, दिशांत दोशी, मनोहर जाधव असे सर्व सल्लागार समितीचे सदस्य होते.
या बैठकीला भुसावळ डी.आर.एम. ऑफिस चे कमर्शियल मनेजर अनिलकुमार पाठक, जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक ए.एम.अग्रवाल साहेब, आरपीएफ इन्स्पेक्टर पाटील व सी.टी.आय. काळे उपस्थित होते, या बैठकीत जळगाव स्टेशन वरील समस्या सर्व समिती सदस्यांनी मांडल्या यात जळगाव रेल्वे स्टेशन वरील स्वच्छता,स्टेशन वर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच जळगाव रेल्वे स्टेशन वर तात्काळ आरक्षण तिकीट खिडकी सुरु करण्यासाठी विनंती करण्यात आली. तसेच जळगाव रेल्वे स्टेशनं वर फर्स्ट क्लास वेटिंग रूम सुद्धा करण्यात यावी. सुरत-भुसावळ पूर्ववत करण्यात यावी. याचबरोबर जळगाव स्टेशन संदर्भातील प्रवाशाच्या अनेक समस्या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांचे निवेदन देखील देण्यात आले.