⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

निलेश राणेंच्या ‘त्या’ व्यक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक, गुन्हे दाखल करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केले होते. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शिवराळ भाषेत मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंविरोधात आक्रमक झाले आहेत.

आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसनिकांना दिले आहेत. त्यानुसार निलेश राणेंच्या विरोधात आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

निलेश राणेंचं ट्विट
सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि MIM पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे.

mh jlg 01 nilesh rane on gulabrao 7205050 07112021113101 0711f 1636264861 1013

दरम्यान, निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेवरही जोरदार टीका केली असून, ‘असं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, अशा शब्दांत घणाघात केला आहे. निलेश राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.