…तर दुसऱ्या टप्प्यातील मृत्यू रोखता आले असते, जळगावात डॉ.निलम गोऱ्हे यांची केंद्रावर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । जगभरात लसीकरण डिसेंबर महिन्यात सुरु झाले. मात्र देशात लसीचा साठा उपलब्ध असतानाही केंद्र सरकारने लसीकरण उशिराने सुरु केले. त्यातही त्यांनी टप्पे आखून दिल्या. जर केंद्राने पहिल्या टप्प्यातील लसीकरण १५ फेब्रवारीपर्यंत पूर्ण केलं असता तर दुसऱ्या टप्प्यातील मृत्यू रोखता आले असते. सर्व चाव्या केंद्राने खिशात ठेवायचे आणि गुजरातला १० हजार कोटी द्यायचे, असे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे म्हटलं आहे.
डॉ.निलम गोऱ्हे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आल्या असून त्यांनी दिवसभर विविध बैठका घेतल्या. निलम गोऱ्हे यांनी दुपारी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बालविवाह रोखण्यासाठी शासन तत्पर असून आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सामाजिक संस्था, पोलीस, युनिसेफ प्रयत्न करीत आहे. महिला बाल विकास विभागाने टास्क फोर्स स्थापन केला आहे. पालकमंत्र्यांनी पक्ष संघटन बांधणी योग्य पद्धतीने केले आहे. संघटनेत बदल करणे आवश्यक आहे. आंदोलनाचे स्वरूप बदलले आहे. ग्रामीण भागातील मुली बाहेर येणे सोपे नाही. मुली निर्भयपणे राजकारणात येत असल्याचे ते डॉ. गोऱ्हे म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांना चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्यातील भेटी बद्दल विचारले असता त्यांनी राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्या भेटीकडे मी तटस्थपणे बघते. राजकारणात कुणीही कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो., असेही म्हणाले.
शिवसेनेचा विश्र्वसाघात झाल्यावर आम्ही दुसरीकडे वळलो. उध्दव ठाकरे यांच्या आचार विचाराचा योग्य सन्मान सहयोगी पक्ष करीत आहे. कोणत्याही अधिकाऱ्यावर आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही.पक्षात मतमतांतरे असू शकतात. सोशल मीडिया मुळे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. कोणीही नाराज नाही. सर्वांची अपेक्षा असते.शिवसेनेला संपविणाऱ्यांची काय भूमिका आहे हे सर्वांना माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/556747669014781