⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

Jalgaon Politics : एका ‘गुलाब’च्या बंडखोरीने दुसऱ्या ‘गुलाब’ला येणार बहर!

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत मोठे बंड केले त्यांच्या या बंडाला सर्वात जास्त पाठबळ ज्या जिल्ह्याने दिले तो जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील पाचही आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यात गुलाबराव पाटील यांनीही शिंदे यांना समर्थन दिले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेल्यामुळे गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ (Gulbrao Wagh) यांना त्यांच्या विरोधातली उमेदवारी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र या दोघांमध्ये होणाऱ्या या फाईटचा थेट फायदा हा गुलाबराव देवकर उचलणार असून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे गुलाबराव देवकर पुन्हा आमदार होऊ शकतात. अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. (Gulabrao Patil vs Gulabrao Wagh vs Gulabrao Devkar)

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि आ. गुलाबराव पाटील यांच्यातला वाद संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात हरवण्याची भूमिका 2009 साली गुलाबराव देवकर यांनी बजावली होती. त्यानंतर 2014 साली गुलाबराव देवकर यांचा गुलाबराव पाटील यांनी पराभव केला. 2019 साली घरकुल मध्ये अडकल्याने गुलाबराव देवकर यांना निवडणूक लढवता आली नव्हती. मात्र गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या बंडामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्याविरुद्ध लाट दिसत असतानाच. याचा फायदा घेण्याचा निर्धार गुलाबराव देवकर यांनी केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या अनुषंगाने मतदार संघात आपला प्रभाव पाडण्याची सुरुवात गुलाबराव देवकर यांनी सुरू केले असल्याचे म्हटले जात आहे..

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेतून केलेली बंडखोरी ही सर्व शिवसैनिकांना पसंत आलेली नाही. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यातून रोश व्यक्त केला जात असतानाच त्यांच्याच मतदारसंघात देखील त्यांना शह देण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात 2019 साली अत्तरदे यांनी लढवलेली निवडणूक सर्वांना आठवत असेल. अत्तरदे यांनी 2019 साली गुलाबराव पाटील यांना मोठी फाईट दिली होती. यामुळे गुलाबराव पाटील त्यावेळी बाल बाल वाचले असे म्हटले जात होते. तर दुसरीकडे आता गुलाबराव वाघ आणि गुलाबराव देवकर हे दोघेही जर गुलाबराव पाटील यांच्यासमोर उभे राहिले तर गुलाबराव पाटील पुन्हा आमदार होणे अतिशय कठीण आहे. अशा चर्चांना उधाण आले आहे.

देवकर लागले कामाला
जळगाव ग्रामीण मतदार संघामधून पुन्हा निवडून येण्यासाठी गुलाबराव देवकर हे कामाला लागले असून त्यांनी मतदारसंघाचा फेरफटका मारला सुरुवात केली असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्याने शिवसेनेचे मत विखुरली जातील मात्र इतर सर्व मतही गुलाबराव देवकर यांना मिळतील असा विश्वास वाटत असल्याने त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. असे म्हटले जात आहे

‘वाघ वि पाटील’ याचा देवकरांना फायदा
गुलाबराव पाटील व गुलाबराव वाघ हे वर्षनोवर्ष शिवसेनेसाठी काम करत होते. या दोघांच्या एकीमुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना वाढली आहे. शिवसेनेची मतं आजवर कधीही विखुरली गेली नव्हती. कारण दोघेही गुलाबराव एक निष्ठेने शिवसेनेसाठी काम करत होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव वाघ असा सामना रंगणार हे नक्की झाले आहे. मात्र या सामन्याचा खरा फायदा होईल तो गुलाबराव देवकर यांनाच असे म्हटले जात आहे.