फेसबुकवर ओळख, नंतर महिलेसोबत जवळीक साधली अन् पुढे घडलं ते धक्कादायक.. जळगावच्या पोलिसावर गुन्हा

सप्टेंबर 25, 2025 10:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । लग्नाचे आमिष दाखवून तरुणी-महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना जळगावमधून समोर आलीय. एका पोलिस कर्मचाऱ्याने फेसबुकवर ओळख झालेल्या प. बंगालमधील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नितीन कमलाकर सपकाळे असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन कमलाकर सपकाळे असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

insta crime

नेमका प्रकार काय?

पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय पीडित महिलेची पोलिस नितीन सपकाळे याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. नितीन याने आपले लग्न झाल्याचे लपवून तिच्यासोबत जवळीक साधली आणि तिला लग्नाचे वचन दिले. या विश्वासाचा फायदा घेत आरोपीने ३० जानेवारी २०२१ ते ५ मे २०२५ या कालावधीत शहरातील हॉटेल सारा, हॉटेल देवहाईट्स, हॉटेल रिचपॅलेस अशा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेत तिच्या संमतीशिवाय तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

पीडित तरुणीला जेव्हा नितीन सपकाळे याच्या लग्नाबद्दल समजले, तेव्हा तिने त्याच्या कुटुंबाला जाब विचारला. त्यावेळी पत्नी दीपाली सपकाळे आणि त्याच्या आईने पीडितेला मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे अखेर पीडितेने मंगळवारी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पोलिस नितीन सपकाळे, त्याची पत्नी आणि आईक्रुिद्ध बलात्कार, मारहाण आणि धमकावणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सुरवळकर करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now