गुन्हेगारांची खैर नाही! जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांची मोठी मोहीम

मे 23, 2026 3:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी एक अत्यंत मोठी आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हिस्ट्रीशीटर्स, सराईत गुन्हेगार, टवाळखोर आणि प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींची संपूर्ण कुंडली आता पोलिसांच्या एकाच क्लिकवर उपलब्ध असणार आहे. यासाठी पोलिसांकडून ‘क्रिमिनल डोजियर M.O.B (Modus Operandi Bureau) डेटाबेस’ तयार करण्याची धडक मोहीम आज दिनांक २३ मे २०२६ रोजीपासून सुरू करण्यात आली आहे.

MOB

या मोहिमेअंतर्गत संबंधित गुन्हेगारांना थेट पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून अत्यंत सविस्तर अशा ‘इंटर्रोगेशन फॉर्म्स’ भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्वक काही पानांचा एक फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामध्ये संबंधित गुन्हेगाराची संपूर्ण माहिती संकलित केली जात आहे. यात कुटुंबाचा डीटेल तपशील, आधार व पॅन कार्ड, मालमत्ता तपशील , वाहने , कोणाच्या नावाने आहेत ,सोशल मीडिया अकाउंट्स, शारीरिक खुणा, टॅटू, मित्रपरिवार यांचा संपूर्ण तपशील ,पूर्वीचे गुन्हे आणि त्याचे स्टेटस ,गुन्ह्याकरण्याची विशिष्ट पद्धत, कार्यक्षेत्र, व्यसनाधीनता ,कर्ज आदी सर्व माहितीचा समावेश आहे.

या मोहिमेमागील प्रमुख उद्देश व फायदे:

एखादा गुन्हा घडल्यानंतर विविध पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हेगारांची माहिती तातडीने शेअर करणे शक्य होईल, ज्यामुळे तपासाला गती मिळेल.फरार असलेल्या आरोपींच्या मालमत्तेच्या तपशीलाच्या आधारे त्यांची मालमत्ता जप्त करणे आणि इतर कठोर कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल.पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांची बदली झाल्यास, नवीन येणाऱ्या टीमला स्थानिक गुन्हेगारांची प्रत्यक्ष ओळख आणि त्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी वेळ वाया घालवावा लागणार नाही. गुन्हेगारांवर वचक आणि सार्वजनिक खच्चीकरण: पोलीस स्टेशनच्या समोरील आवारातच ही सर्व प्रक्रिया जाहीरपणे राबवून गुन्हेगारांचे सार्वजनिक खच्चीकरण केले जात आहे, ज्यामुळे समाजात कायद्याबद्दल विश्वास निर्माण होईल आणि गुन्हेगारांमध्ये भीती बसेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now