जळगाव जिल्हा

आमदार सुरेश भोळेच्या आरोपांनंतर पाइपलाइन चोरी प्रकरणात निरीक्षक शर्मांची बदली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । जळगाव महानगरपालिकेच्या पाइपलाइन चोरी प्रकरणातील गंभीर आरोपांनंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांची बदली केली. प्रकरणात आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.

पाइपलाइन चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे नाव गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिमांड नोटमध्ये चुकवण्यात आल्याचा आरोप आमदार भोळे यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यांनी असे नमूद केले होते की गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन आठवडे उलटूनही प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. मतदारसंघात आल्यावर शनिवारी आमदार भोळे यांनी पोलिसांवर जाहीर आरोप केले होते, ज्यानंतर एसपींनी ही कारवाई केली.

तालुका पोलिस ठाण्याचे महेश शर्मा यांची बदली करून त्यांच्या जागी संजय गायकवाड यांना नवीन पदभार सोपवण्यात आला आहे. या बदलीने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आमदार भोळे यांच्या आरोपांनंतर पोलिस अधीक्षकांनी घेतलेली ही कारवाई न्याय्य आणि पारदर्शक असल्याचे सांगितले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button