पंतप्रधान दौऱ्यानिमित्त जळगाव-नेरी मार्ग वाहतुकीसाठी बंद, ‘या’ मार्गाने ये-जा करावी लागणार

ऑगस्ट 22, 2024 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार असून या सभेकरिता राज्यातुन तसेच जिल्हयातून विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व नागरीक मोठ्या संख्येने येणार आहेत. सभा कार्यक्रम स्थळ हे जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर असल्याने सदर मार्गावरील रहदारीचे नियमन व कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये याकरीता जळगाव शहरातील व जिल्हयातील वाहतुक मार्गामध्ये तात्पुरते बदल करणे आवश्यक आहे.

pm modi tour jalgaon

जिल्हा जळगाव मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३३ (१) (बी) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जळगाव शहरातील पुढील ठिकाणी आणि वेळी सर्व प्रकारच्या वाहनांच्या विनिमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढील प्रमाणे आदेश देत आहे. रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी अतिमहत्वाचे व्यक्ती (व्हीव्हीआयपी) यांचा जळगाव जिल्हा दौरा-सभा कार्यक्रम आयोजिक करण्यात आलेला आहे. तरी जळगाव शहर व जिल्हयातील खालील नमुद ठिकाणी दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी सकाळी ०७.०० ते सायं १८.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची (अत्यावश्यक सेवा वगळून) तात्पुरते मार्गात बदल व मार्ग बंद करीत आहे.

रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ०७.०० वा पासून ते सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळ ते नेरी, ता.जामनेर हा मार्ग सर्व प्रकारच्या अवजड व हलके वाहनांना येण्यास व जाण्यास बंद राहिल.

पर्यायी मार्गात तात्पुरता बदल
जळगाव कडुन नेरी, पहुर, छत्रपती संभाजीनगर कडेस जाणा-या वाहनांनी जळगाव शिरसोली वावडदामार्ग – नेरी यामार्गाचा जाण्यासाठी वापर करावा. तसेच छत्रपती संभाजीनगर, पहुर, जामनेर कहुन येणा-या वाहनांनी नेरी – वावडदा – शिरसोलीमार्ग जळगाव या मार्गाचा येण्यासाठी वापर करावा,
नेरी, गाडेगाव, उमाळा चिंचोली, देव्हारी, करमाड, पळासखेडे, जळके (तांडा) या गावाकडुन जळगावला येणा-या वाहनांसाठी वावडदा, शिरसोली मार्गे जळगाव या पर्यायी मार्गाचा सायंकाळी 6 वाजेपर्यंत वापर करावा, असे आवाहन डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now