जळगावातील खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताच्या अवघ्या काही तासात आवळल्या मुसक्या

ऑक्टोबर 3, 2025 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री जुन्या वादातून ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय-२७) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेच्या अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) असं अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

mr jl

याबाबत असे की, कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. या वादात ज्ञानेश्वर पाटील या तरुणाची दोन तरुणांनी धारधार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केलं. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान घटनेच्या अवघ्या काही तासातच संशयित आरोपी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद परिसरातून शिताफीने अटक केली. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now