जळगाव महापालिका निवडणूक : दुपारी 3.30 वाजेपर्यंत 34.27 टक्के मतदान

जानेवारी 15, 2026 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु असून दुपारी 3.30 वाजेपर्यंत 34.27 टक्के इतके मतदान झाले आहे.

loksabha election jpg webp

मतदानाच्या सुरुवातीच्या दोन तासात ५.५ टक्के मतदान झाले होते. यानंतर सकाळी ११:३० वाजेपर्यंत १३.३९ टक्के तर दुपारी १:३० पर्यंत केवळ २२.४९ टक्के मतदान झाले होते. यानंतरच्या दोन तासात मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत १ लाख ५० हजार २९९ मतदारांनी (34.27 टक्के) आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. इतके मतदान झाले आहे. यामध्ये ७९,७२७ पुरुष तर ७०,५७२ महिलांचा समावेश आहे.

आता मतदानाचा शेवटचा टप्पा (सायंकाळी ५:३० पर्यंत) अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उर्वरित वेळेत नोकरदार वर्ग, तरुण आणि शेवटच्या क्षणी बाहेर पडणारे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात, यावरच जळगावच्या सत्तेचे समीकरण अवलंबून असेल.प्रशासनातर्फे अद्यापही उर्वरित मतदारांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now