⁠ 

मेहरूण तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाचा चार कोटींचा ‘प्लॅन’; वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२। आजूबाजूच्या तब्बल अकरा ठिकाणांहून वाहत येणाऱ्या सांडपाण्यामुळे मेहरूण तलावाचे जलप्रदुषण होत आहे. यावर आता मनपाने कायमस्वरूपी ताेडगा काढण्यासाठी दाेन पर्यायांचा विचार केला आहे. यात सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पासाठी डीपीआर तयार झाला आहे. तर दुसरा पर्याय तलावाच्या काठावरून पाइपलाइन टाकण्याचा आहे. मात्र ३ महिने उलटूनही अजून यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

मेहरूण तलावात परिसरातील सांडपाणी वाहुन येत असल्याने जलप्रदुषण वाढले आहे.पर्यायी पर्यावरण प्रेमी व जळगावकर संतप्त झाले आहेत. यासंदर्भात मनपाने ऑगस्ट महिन्यात सर्वेक्षण केले हाेते. यात शिरसाेली राेड व माेहाडी राेड परिसरातील अकरा सर्वेमधून सांडपाणी तलावात जात असल्याचे निष्पन्न झाले हाेते. यावर पर्याय म्हणून सांडपाणी जमिनीत जिरवणे, सांडपाण्यावर प्रक्रीया करणे तसेच तलावाच्या काठावर भुयारी गटार उभारण्यावर विचार सुरू केला हाेता. त्यानुसार महापालिका प्रशासन आता दाेन पर्यायांपर्यंत येवून पाेहचल्याने तलावाचे गटार हाेण्याची प्रक्रीया लवकर थांबेल असे अपेक्षित आहे.मात्र अजून ठोस निणर्य घेण्यात न आल्याने अजूनही प्रदूषण रोखण्यात आलेले नाही.

मनपाने अहमदाबाद येथील एनजीओच्या माध्यमातून तलावाच्या परिसरात सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारणीसाठी डीपीआर तयार केला आहे.यावर प्राथमिक बैठकाही झाल्या आहेत. बैठकांमध्ये तलावात वाहुन येणारे पाणी एकाच ठिकाणी साठवून त्यावर प्रक्रीया केली जाईल. सुमारे दिड लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे चार ते पाच काेटींचा खर्च अपेक्षित आहे. अश्या प्रकारच्या चर्चा झाल्या. मात्र मनपात झालेल्या आयुक्त पदाच्या बदलीमुळे अजून यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

प्रक्रीया प्रकल्पासाेबतच तलावाच्या चारही बाजुने पाईप लाईन टाकून त्यातून सांडपाणी तलावाच्या सांडव्यापर्यंत वाहुन नेण्याचा दुसरा पर्याय अाहे. यासाठी २०१८ मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी पाईपलाईनचा पर्याय सुचवला हाेता. त्या वेळेला सुमारे दिड काेटींचा खर्च अपेक्षित हाेता. त्यामुळे अाजच्या बाजारभावानुसार आहे. त्याच कामासाठी दाेन ते अडीच काेटींचा खर्च हाेवू शकताे. यासाठी डीपीसीमधून देखिल निधी मिळण्याची शक्यता आहे.