---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव महानगरपालिकेचा १२४७ कोटीचा अर्थसंकल्प सादर; या कामांसाठी तरतूद?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिकेचा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात सन २०२५-२०२६ चा १२४७ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान, मनपाने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २३५ कोर्टीचे वाढीव अंदाजपत्रक तयार केले आहे. यात कोणतीही करवाढ न केल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र पुढच्या वर्षी करवाढ होईल, असे संकेत देखील दिले आहे. या वर्षात करात कोणतीही वाढ न करता महसूली व भांडवली लेखाशिर्षाअंतर्गत महत्वाच्या बाबींवर खर्चाची तरतुद करण्यात आली आहे.

jalgaon manapa

या अर्थसंकल्पात मालमत्ताकर व पाणीपट्टीकर मॉड्युल्सचे आयजीआर प्रणालीशी एकत्रीकरण करण्यासाठी रु. १ कोटी, गाळाभाडे/ नुकसान भरपाई व परवाना फी, मनपा मालमत्ता संगणकीकरणाकामी रु.१ कोटी, विद्युत विभागाअंतर्गत एलईडी पथदिवे लावणे/ सौरउर्जा संवर्धन प्रकल्प/ चार्जिंग स्टेशनकामी रु.५.२५ कोटी तसेच नाले स्वच्छतेकामी रु. २ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

---Advertisement---

या कामांसाठी तरतूद :
नवीन गटारी (६ कोटी), नवीन बगीचे (५० लाख), नवीन रस्ते (१६ कोटी), पथदिवे लावणे, चार्जिंग स्टेशन काम (५ कोटी २५ लाख), नाले सफाई (२ कोटी), औषध खरेदी, उपकरणे, श्वान दंश लस (३५ लाख), रस्ता व्यवस्था व दुरुस्ती (५ कोटी ५० लाख), स्वच्छतागृहे व्यवस्था व दुरुस्ती (४० लाख), गटार व्यवस्था व दुरुस्ती (३० लाख), दिशादर्शक फलक लावणे (२५ लाख), मनपा मिळकती सर्वेक्षण व व्हॅलूएशन (८० लाख), डिजिटल शाळा करणे, दर्जा उंचावणे (एक लाख), शाळा इमारत दुरुस्ती व संरक्षण भिंत दुरुस्ती (१ कोटी ५० लाख), पाणी शुद्धीकरणासाठी (२ कोटी ५० लाख), नवीन पाइपलाइन व दुरुस्ती (५ कोटी ५० लाख), नवीन पोल उभारणे (१ कोटी २५ लाख), भूसंपादन मोबदला (२१ कोटी).

२०२५-२६ या आर्थिक वर्षात अमृत १.० मलनिस्सारण योजना पूर्णपणे कार्यान्वित होणार असून या अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यामुळे प्रत्येक घराचे शौचालय व सांडपाणी जोडणी या योजनेच्या प्रापॅटी चेंबरला जोडण्यात येणार असून मलप्रवाह कर लागू होणार आहे. जोडणी शुल्काची सुध्दा आकारणी होईल. यंदा पाणी पुरवठयातून २०२४-२५ या वर्षासाठी ३६.३८ कोटी इतके उत्पन्न तर २०२५-२६ या वर्षात ४६.५८ कोटी इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नळजोडणी सुरू असून त्यातून उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. अमृत २.० मध्ये प्रकल्पात १०० टक्के ग्राहक मीटर जोडणी व स्कॅड ऑटोमेशनचा समावेश आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---