---Advertisement---
विशेष गुन्हे जळगाव जिल्हा जळगाव शहर

जळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : शहर पोलीस ठाणे हद्दीतील रोलेट गेम, फन टार्गेट बंद!

---Advertisement---

रामानंद नगर पोलिसांचे लक्ष कधी जाणार, मोठा मासा अद्याप मोकाटच

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील सट्टा, पत्ता हा काही नवीन राहिलेला नाही त्यातच आता ऑनलाईन जुगारची भर पडली आहे. देशभरात अनेक ठिकाणी बदली असलेला रोलेट, फन टार्गेट ऑनलाइन गेम जळगावात सुरू झाला असल्याचे वृत्त ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत पोलिसांनी फेरफटका मारताच शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुकानांना कुलूप लागले आहे. पोलिसांच्या कारवाई आधीच अवैध धंदे मालकांनी पळ काढला आहे.

images 1 4 jpeg webp webp

नाशिकसह अनेक ठिकाणी मोठा वाद उभा राहिलेला रोलेट आणि फन गेम जळगावात सुरू झाला आहे. दोन्ही गेमचे व्यसन फार घातक तर आहेच परंतु सोबतच ‘दस का दम’ हा ऑनलाईन गेम देखील जळगावात सुरू झाला आहे. नाशिकमध्ये एक तरुण शेतकरी या गेममध्ये ४५ लाख रुपये हरला तर एकाने ३० लाख गमावल्याने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात नाशिक येथील कैलास शहा या मास्टर माईंडला देखील पोलिसांनी अटक केली होती.

---Advertisement---

‘दस का दम’मध्ये एक २० रुपयांच्या डावला १०० रुपये मिळतात तर फन टार्गेटमध्ये एका गेमला ९ ते ३६ रुपये मिळतात. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जुने बस स्थानक शेजारील गल्लीत ३ दुकानात हा गेम सुरू असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजने प्रसिद्ध केले होते. ऑनलाईन पद्धतीने खेळला जाणाऱ्या या गेमचा निकाल अवघ्या १ मिनिटात येत असतो आणि दिवसभर हा खेळ सुरू असल्याचे जळगाव लाईव्ह न्यूजने मांडले होते.

वृत्त प्रसिद्ध होताच रोलेट, फन टार्गेट गेम खेळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. शहर पोलिसांनी आणि एलसीबीच्या पथकाने देखील लागलीच आपला मोर्चा त्यादिशेने वळवला. बातमीमुळे ऑनलाईन सट्टा खेळवणाऱ्यांनी लागलीच आपला गाशा गुंडाळला आहे. सध्या तिन्ही दुकानांना कुलूप लागलेले असले तरी ते कधीपर्यंत असणार हे सांगणे मात्र अवघड आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीतील रोलेट गेम आणि फन टार्गेट गेम बंद झाला असला तरी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र अजूनही सुरू आहे. पोलीस दादा त्याठिकाणी कारवाई कधी करणार याची प्रतिक्षा अद्याप कायम आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---