Gold Rate : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचा भाव घसरला ; जळगावातील ताजे दर तपासून घ्या

एप्रिल 28, 2025 11:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । अक्षय्य तृतीया सण आता अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदाची अक्षय्यतृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी होणार आहे. या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे संपत्ती ‘अक्षय’ राहते, असा समज आहे. मात्र, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याची किमत १ लाखापर्यंत गेली. परंतु मागच्या काही दिवसात लाखाच्या पुढे गेलेले सोने आता घसरले आहे.

gold silver 2 jpg webp

जळगाव सराफ बाजारात सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९६,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. गेल्या आठवड्यात २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर विनाजीएसटी ९९००० रुपयावर तर जीएसटीसह १ लाखाच्या वर गेला होता. मात्र मागच्या काही दिवसात त्यात घसरण दिसून आली. दुसरीकडे चांदीचा दर ९८००० रुपये प्रति किलोवर आहे.

त्यामुळे उच्चांकीपासून सोन्याचा घसरला असून यामुळे लग्नसराईत किंवा अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. सराफ व्यावसायिकांनाही बाजारात खरेदी वाढण्याची आशा आहे. सध्याचे चढ-उतार लक्षात घेता अक्षय्य तृतियेपर्यंत सोन्याचे दर आणखी वधारतात की घसरतात, त्याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment