Gold Silver : जळगावमध्ये सोने-चांदी दरात मोठा बदल, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आताचे भाव?

ऑगस्ट 22, 2025 12:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । जळगावच्या सराफ बाजारात मागच्या तीन दिवसापासून सोने दरात घसरण दिसून आली. सोबत चांदीही घसरली. यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र गुरुवारी एकाच दिवसात सोने दरात प्रति तोळा ५०० रुपयांची तर चांदी दरात १ हजाराहून अधिकची वाढ दिसून आली

gold jpg webp

या दरवाढीनंतर आज सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९९५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे . तर जीएसटीसह सोन्याचा दर एक लाखाच्या वर आहे. दुसरीकडे काल चांदी दर १००० रुपयांनी वाढून प्रति किलो ११४००० रुपयावर पोहोचली.

दरम्यान ८ ऑगस्टला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, २४ कॅरेट सोन्याचा दर त्यावेळी जीएसटीविना १०१६०० रुपयांवर होता. जळगावात उच्चांकी किमतीपासून सोने २१०० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसात सोने दरात घसरण झाली.त्यात ८०० रुपयांहून अधिकची घसरण झाली होती मात्र गुरुवार त्यात पुन्हा वाढ झाली. दरम्यान आता आगामी सणासुदीच्या काळात सोन्याचा दर कमी होणार की वाढणार ? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now