उच्चांकी गाठल्यानंतर जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याचा दर घसरला, आताचे दर पहा?..

जून 17, 2025 8:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२५ । इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतींनी नवे विक्रम केले असताना, या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमती अचानक घसरल्या. जळगावच्या सवर्णनगरीत सोने दरात ४०० रुपयांची घसरण झाली. यामुले शुद्ध सोन्याचा दर ९९,६०० (जीएसटीसह १०२५८८) रुपयावर पोहोचला आहे.

gold silver 2 jpg webp

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि इस्रायल-इराण संघर्ष वाढत असताना, पिवळ्या धातूने दररोज नवे विक्रम करताना पाहिले. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी एक लाखावर पोहोचले होते. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसत आहे.

मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात घसरण दिसून आली. सोने ४०० रुपयांनी घसरून ९९,६०० विनाजीएसटी पोहोचले. तर चांदीचा दर स्थिर असून सध्या एक किलोचा दर १०६००० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment