जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२५ । सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झालीय. जळगावात मागील दहा दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १०,००० रुपयांची वाढ झाली. तर आज चांदी दरात तब्बल २२०० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीने १,०८,००० प्रति किलो असा ऐतिहासिक टप्पा गाठला. दुसरीकडे सोन्यातही वाढ झाली असून यामुळे खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. यातच मागील दहा दिवसांत दहा हजार रूपयांनी चांदीची किंमत वाढली आहे. चांदीचा भाव प्रति किल एक लाख रूपयांवर पोहचला आहे. तर सोन्याची किंमत प्रति तोळा २०० रूपयांनी वाढून ९९ हजार रूपयांपर्यत पोहचली आहे.

युनायटेड स्टेट्ससह अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉर आणि जिओ-पॉलिटिकल तणावाचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे. इतर देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर दर वाढले होते. जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीशिवाय सोनं प्रति तोळा ९८ हजार ९८० रूपये इतके आहे.
दरम्यान येत्या काळात आणखी चांदीसह सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे ग्राहकांनी सद्यस्थितीत चढत्या दरालाच योग्य संधी मानत सोने-चांदी खरेदीचा निर्णय घ्यावा, असे सराफ बाजारातील दुकानदार सांगत आहेत.







