जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । एकीकडे देशभरात लग्नाचा हंगाम सुरू असताना सोन्याचे (Gold Rate) भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जळगावच्या सुवर्णपेठेत चालू व्यापार आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शुक्रवार सोन्याचे दर तब्बल २२०० रुपयांपर्यत वाढले आहे. सोबतच चांदीचा (Silver Rate) दर देखील ३ हजार रुपयापर्यंत वधारला आहे. Jalgaon Gold Silver Rate Today

जळगाव सराफ बाजारात मागील दोन दिवपासून सोन्याचे दर स्थिर दिसून आले. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ७८,००० (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,१०० (जीएसटीसह ८७,६५०) रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे/ दुसरीकडे चांदीचा दर ९६,५०० (विनाजीएसटी) रुपये प्रति किलो इतका आहे. अमेरिकेत नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळाले.
चालू वर्षात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ
दरम्यान, चालू वर्षात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ दिसून आली आहे. आकडेवारी पाहिली ३१ डिसेंबरच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याचा भाव ७७,५०० रुपये होता. तर शुक्रवारी सोन्याचा भाव ८५,१०० रुपयांवर पोहोचला होता. याचा अर्थ असा की सोन्याच्या किमतीत सध्या प्रति तोळा ७,६०० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. सोन्याचा दर ९० हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.