जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । सोन्यासह चांदीच्या किमतीत गेल्या आठवड्यात वाढ दिसून आली. मात्र जळगावच्या सराफा बाजारात या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंमध्ये घसरण झालीय.
सुवर्णनगरी जळगाव येथील सराफा बाजारात सोमवारी सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. सोन्याचे दर १ हजार २३९ रुपयांनी, तर चांदीचे दर ३ हजार ६९३ रुपयांनी झाले कमी झाले. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. दर घसरल्याने आज खरेदीदारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
काय आहे नवा भाव?
घसरणीनंतर जळगावात आता २४ कॅरेट सोन्याचा ६९ हजार ६०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीचा एक किलोचा भाव ८२ हजार रुपयांवर आला आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात सीमाशुल्क कपातीच्या घोषणेनंतर सोने-चांदीचे दर आधीच मोठ्या प्रमाणात खाली आले होते. त्यानंतर काही प्रमाणात दर वाढले होते, पण दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी बाजार उघडताच दरात घसरण झाली आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता, इराण व इस्रायल युद्ध भडकण्याची भीती आणि बांगलादेशातील घडामोडींचा परिणाम सराफ बाजारावर दिसून आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.