Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याने ओलांडला 84 हजाराचा पल्ला; चांदीही वधारली

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२५ । उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प(Union Budget 2025) सादर होणार असून मात्र त्याआधी सोन्याच्या किमतींनी इतिहास रचला आहे. आठवडाभरापासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत असून बुधवारपाठोपाठ गुरुवारीही सर्वकालिन उच्चांकी दराची पातळी गाठली. त्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. Gold Silver Rate
जळगावच्या सुवर्णपेठेत काल गुरुवारी सोन्यादर दर ३०० रुपयांनी वाढला. यामुळे आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ८१७०० (जीएसटीसह ८४१५१) रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा दर एक हजार रुपयांनी वाढला. यामुळे आता चांदीचा एक किलोचा भाव ९४००० रुपयावर पोहोचला आहे.
सोन्याच्या दर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात स्थिरतेकडून तेजीकडे सरकत असताना बुधवारी (दि.२२) प्रथमच ६०० रुपयांनी वाढून ७९९०० वरुन ८०६०० वर गेले. त्यानंतर चारपाच दिवस स्थिर राहून पुन्हा बुधवारी (दि.२९) रोजी ८०० रुपयांनी वाढून ८१४०० (जीएसटीसह ८३०१८) या विक्रमी पातळीवर गेले होते. गुरुवारी सोने आणखी ३०० रुपयांनी महागून ८१७०० या आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे.
दरम्यान, ही दरवाढ शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकेची व्याजदरात कपात, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत अशा कारणांमुळे झाली असून त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यावर परिणाम दिसून येत आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.