Gold Rate आनंदवार्ता ! सोन्यात १३०० रुपयांनी घसरले, जळगावात आताचे दर काय?

जून 28, 2025 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२८ । सोने चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. काही दिवसापूर्वी १ लाख रुपयांवर गेलेले सोन्याचे दर आता खाली आले आहे.

gold silver jpg webp

जळगाव सराफ बाजारात काल शुक्रवारी सोने दरात १३०० रुपयांनी घसरुन ९६२०० (जीएसटीसह ९९,०८६) रुपये तोळा झाले. यासोबतच चांदीही १ हजारांनी घसरुन प्रती १०६००० (जीएसटीसह १,०९,१८०) रुपये किलोवर स्थिरावली.

दरम्यान इराण आणि इस्त्रायल यांच्यामधील युद्धाच्या काळात सोन्यासह चांदीचे दर वेगानं वाढत होते. मात्र, इराण- इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याचे दर घसरत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर विनाजीएसटी ९९३०० रुपये प्रति तोळा इतका होता. तर चांदीचा दर १०७००० रुपये इतका होता. या आठवड्यात सोने दरात तब्बल ३ हजार रुपयांपेक्षा अधिकची घसरण झालीय. तर चांदी दरातही घसरण झालीय. दरम्यान, सोने व चांदीत अस्थिरता सुरुच राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now