जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२५ । सोने चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे जळगावच्या सुवर्णबाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली. तर गेल्या तीन दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शनिवारी मोठी घसरण झाली.

काय आहे आता सोन्याचा भाव
जळगाव सराफ बाजारात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली. सोन्याचा दर ५०० रुपयांनी घसरला. यामुळे आज रविवारी सकाळच्या सत्रात शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९८५०० (जीएसटीसह १०१४५५) रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर मागच्या तीन दिवसात सोने दरात २३०० रुपयांहून अधिकची घसरण झाली.

चांदीचा भाव
गेल्या तीन दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शनिवारी दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख १३ हजार ५०० रुपयांवर आली. गेल्या आठवड्यात चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात २३ जुलै रोजी एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १६ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर २४ व २५ जुलै रोजी ती याच भावावर स्थिर होती. मात्र, २६ जुलै रोजी त्यात दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख १३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.










