जळगाव सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने 700 रुपयाने वधारले; आता प्रति तोळ्याचा दर काय?

मे 16, 2024 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२४ । सध्या लग्नसराईला मुहूर्त नसले तरी सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या दोन्ही धातूंमध्ये चढउतार सुरु असून गेल्या दोन दिवसाच्या घसरणीनंतर बुधवारी जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. एकाच दिवसात सोने ७०० रुपयांनी वधारले आहे. चांदीचा दर मात्र स्थिर दिसून आला

gold jpg webp

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात घसरण दिसून आली. दोन दिवसाच्या घसरणीनंतर बुधवार, १५ मे रोजी सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.

मार्च महिन्यापासून मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीचे भाव एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कमी होत गेले. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते पुन्हा वाढू लागले. त्यात १० मे रोजी सोने पुन्हा एकदा ७३ हजारांच्या पुढे गेले होते. किरकोळ चढ-उतारानंतर मंगळवार, १४ मे रोजी त्यात ४०० रुपयांची घसरण झाली व ते ७२ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर आले. मात्र बुधवारी त्यात ७०० रुपयांची वाढ झाली व ते ७३ हजार ४०० रुपये प्रतितोळा झाले.

यासोबतच १० मे रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली होती. नंतर ती ८४ हजारांवर आली व १३ रोजी पुन्हा ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली. मंगळवारी त्यात पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व ती ८५ हजार रुपये प्रतिकिलो झाली. बुधवारीदेखील हेच भाव कायम होते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now