---Advertisement---
जळगाव जिल्हा सोने - चांदीचा भाव

Gold Silver Rate : जळगाव सराफ बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीही तेजीत ; आताचे भाव तपासा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२५ । एकीकडे सोन्याचा (Gold Rate) दर दररोज नवनवीन उच्चांक गाठत असताना असता चांदीच्या किमतीतही वाढ होत चालली असून यामुळे चांदीचा (Silver Rate) दर नव्या उच्चांकच्या दिशेने जात आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत चांदीचा दर चार महिन्यांनंतर एक लाखावर गेला आहे. जळगाव सराफ बाजारात चांदीचा भाव प्रति किलो ९८ हजार (जीएसटीसह १००९४०) रुपयांवर पोहोचले आहेत.

gold silver 1 jpg webp

जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदीचे प्रति किलोचे दर ८८ हजार होते तर शेवटच्या दिवशी चांदी ९५ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर ३ फेब्रुवारीला चांदीत १ हजारांची घसरण होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा ९५ हजारांवर आली. पुन्हा दुसऱ्या दिवशीच २ हजार रुपयांनी चांदी महाग होऊन ९७हजारांवर पोहोचली. त्यानंतर दहा दिवस १२ फेब्रुवारीपर्यंत चांदीचे दर ९७ हजार रुपये किलोवर स्थिर होते.

---Advertisement---

ते शुक्रवारी ९८ हजारांवर पोहोचले. जीएसटीसह १००९४० झाली. चांदी शुक्रवारी जीएसटीसह १००९४० रुपयांवर पोहोचली. ऑक्टोबर महिन्यात ३० तारखेला चांदीचे प्रति किलोचे दर विना जीएसटी १ लाख तर जीएसटीसह १०३००० रुपये झाले होते. ते आजवरचे विक्रमी उच्चांकी आहेत. तर १ नोव्हेंबर रोजी ९८ हजारांवर घसरली होती. दरम्यान जानेवारी महिन्यात चांदीचे दर हे ८८ हजार रुपये किलोवर आले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---