Gold Rate : सोने चांदीचा तोरा उतरला, आज जळगावच्या सराफ बाजारात असे आहेत भाव?

मे 31, 2025 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२५ । सोने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे सोने दरात घसरण झाली. अमेरिकन सरकारने ट्रम्प सरकारचे टेरिफबाबतचे निर्णय अमेरिकेच्या कोर्टानं नाकारल्यानंतर सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसून आली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात सोने ४०० रुपयांनी तर चांदी एक हजाराने स्वस्त झाली.

gold silver 5

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय सोने बाजार बंद होताना मोठी घसरण होण्याचा अंदाज असताना सोने प्रतितोळा ४०० रुपये घसरले. यांनतर जळगावच्या सराफ बाजारात सोने ९६ हजारांवरून ९५६०० (जीएसटीसह ९८४६८) रुपये झाले. चांदी १ हजाराने घसरुन ९९५०० रु. किलोवरुन ९८५०० (जीएसटीसह १०१४५५) रुपये झाली. ट्रम्प सरकारने आयात निर्यात विषयक नव्या दरांची घोषणा केल्याने सोने दरात मोठा चढ-उतार बघायला मिळत होता.

या नव्या टेरिफ दराबाबत जगातील पाच दिग्गज कंपन्या अमेरिकन न्यायालयात गेल्या होत्या. त्यांच्या बाजूने निकाल लागून ट्रम्प सरकारचे निर्णय चुकीचे ठरवले. त्याचे पडसाद म्हणून आंतरराष्ट्रीय सोने बाजारात चढउतार होत आहेत. प्रत्यक्षात धातुच्या खरेदी विक्रीच्या दरावर त्याचा परिणाम होत नसल्याचे अभ्यासक म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment