दिवाळीपूर्वी सोने-चांदीचा भाव घसरला; जळगावात आता प्रति ग्रॅम भाव किती?
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२४ । दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण सोने चांदी खरेदी करतात. मात्र यंदा दिवाळीपूर्वी सोन्यासह चांदीच्या किमतीने इतिहास रचला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. परंतु आज दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव घसरला आहे. सोबतच चांदीचा दर देखील खाली आला आहे.
जळगाव सराफ बाजारात गुरुवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५०० रुपयांनी घसरला आहे. तर चांदीचा दर १००० रुपयांनी घसरला आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. तरी दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
काय आहेत आता भाव?
सराफा बाजारात शुक्रवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७९,००० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव रुपये ७२,४२० आहे. दुसरीकडे १ किलो चांदीची किंमत ९९००० रुपये इतकी आहे.
वायदे बाजारात सोन्याची किंमत
सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतींत इतके दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज सोन्याचे भाव नरमलेले पाहायला मिळत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी ११.३० वाजेपर्यंत सोन्याचा भाव २६० रुपयांच्या घसरणीसह ७८,०७० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा दर ५७० रुपयांनी घसरून ९६,४६२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.