Gold Rate : जळगावच्या सुवर्णबाजार सोने-चांदी दराची विक्रमी झेप ; खरेदीपूर्वी आताचे दर तपासून घ्या..

जुलै 23, 2025 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२५ । सोने आणि चांदी दरात सध्या वाढ होताना दिसत असून मंगळवारी जळगावच्या सराफ बाजारात सोने दराने विक्रमी झेप घेतली. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातील तेजी कायम असल्याचे पाहायला मिळते आहे. एकाच दिवसात सोने दरात १४०० रुपयांची वाढ झाली असून यामुळे पहिल्यांदाच जीएसटीविना १० ग्रॅम सोने दराने एक लाखांचा टप्पा गाठला आहे.

GS23 July

काय आहे आजचा भाव?

गेल्या २४ तासात सोने दरात मोठी वाढ दिसून आली. जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम १४०० रुपयांनी वधारले. यामुळे पहिल्यांदाच सोने विनाजीएसटी १ लाखांवर पोहचले. तर जीएसटीसह १ लाख ३ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दराने सुद्धा विक्रमी उच्चांकी गाठली असून इतिहासात पहिल्यांदाच चांदीचे दर जीएसटी सह १ लाख १८ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहे.

दरवाढीचे कारण काय ?

दरम्यान सर्व देशांवर नव्याने जे टेरीफ रेट लागू झाले आहे, जगतील काही देशांमधील अस्थिरतेचा देखील सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.

दर गगनाला भिडल्यामुळे सोन्या आणि चांदीच्या खरेदीपेक्षा दागिन्यांची मोड करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. दोन्ही धातुंच्या हनुमान उडीमुळे दिवाळीपर्यंत सोने-चांदी सव्वा लाखांचा टप्पा गाठण्याची भीती व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now