ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचे दर घसरले, आताचे दर पहा..

मार्च 20, 2026 12:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवरच गुरुवारी जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे भाव ६,९०१ रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल १८,५४० रुपयांची घसरण झाली. यामुळे लग्नसराईसाठी दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

gold silver 1 jpg webp

जळगाव सराफ बाजारात आज सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५३,२६४ प्रति १० ग्रॅमवर होते. तर चांदी २,४४,११० रुपयांवर म्हणजेच अडीच लाखांच्या खाली आली. यामुळे चांदी मागील ७८ दिवसांच्या (३ जानेवारी २०२६) नीचांकी पातळीवर आली.

एकीकडे मध्यपूर्वेतील युद्धामुळे सोन्या चांदीचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. उलट दोन्ही धातूंचे दर घसरताना दिसत आहे. गेल्या १९ दिवसांत सोन्यात २२,६६० रुपये तर चांदीत तब्बल ५९,७४० रुपयांची मोठी घट झाली आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत चांदीच्या भावात तब्बल १६ टक्क्यांची घट नोंदली गेली आहे. १ मार्च रोजी सोन्याचे दर १,७५,९२४ रुपये प्रति तोळा तर चांदी ३,०३,८५० रुपये प्रति किलो होते

काय आहेत घसरणीचे कारण?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदर ३.५ % ते ३.७५% वर स्थिर ठेवल्याने सोन्याची झळाळी कमी झाली.जागतिक बाजारात डॉलर निर्देशांक वधारल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्यापेक्षा डॉलरकडे वळला. सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. अशा विविध कारणामुळे सोने चांदीचे दर घसरताना दिसत आहे.

दरम्यन, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता असली तरी ही परिस्थिती फार काळ टिकून राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात लग्नसराई लक्षात घेता पुन्हा दरवाढीची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now