⁠ 
[rank_math_breadcrumb]

दिवाळीच्या एक दिवसआधी सोने चांदीने मोडले सगळे रेकॉर्ड​; प्रथमच भाव ‘इतका’ वाढला..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२४ । दिवाळी पूर्वसंध्येला सोने आणि चांदीच्या किमतीने नवीन रेकॉर्ड केला आहे. बुधवारी सोन्याच्या किमतीत प्रति तोळा ८०० रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीने विनाजीएसटी ८० हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीत एक हजार रुपयाची वाढ झालीय. यामुळे चांदीने देखील विनाजीएसटी एक लाखाचा टप्पा गाठला.

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सतत चढ-उतार सुरूच असून विक्रमी दरवाढीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती नरमल्या होत्या पण दिवाळीच्या तोंडावर दोन्ही मौल्यवान धातूंनी जबरदस्त उसळी घेतली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना सोनं-चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे.

आजचे जळगावातील भाव?
जळगावच्या सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७३,७०० रुपये (१० ग्रॅम) इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८०,४०० रुपये प्रति तोळा तसेच जीएसटीसह ८२,८१२ रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर १००००० रुपये प्रति किलो इतका आहे.

दरम्यान, दिवाळी मुहूर्तावर सोन्याची खरेदी शुभ मानली जात असल्याने मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या परिणामाने सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याच्या शक्यतेने दागिन्यांसह गुंतवणुकीसाठी सराफा बाजारात सोन्याची जोरदार खरेदी सुरू आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.